GRAMIN SEARCH BANNER

बिजघर नंबर १ शाळेत ‘प्रवेशोत्सव’ उत्साहात साजरा: नवागतांचे जल्लोषात स्वागत

Gramin Search
7 Views

खेड : नवीन शैक्षणिक वर्षाचा १६ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. याच पार्श्वभूमीवर बिजघर नंबर १ शाळेत शाळा प्रवेशोत्सव, मोफत पाठ्यपुस्तक वाटप आणि मोफत गणवेश वाटप या त्रिविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात नवागतांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अग्निशमन दल अधिकारी तथा राष्ट्रपती पदक विजेते मधुकरराव भोसले हे होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. याप्रसंगी गावच्या प्रथम नागरिक सरपंच महोदया शुभांगी भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यात गावचे मानकरी सुनीलराव भोसले, माजी सैनिक कॅप्टन राजारामराव भोसले, माजी पोलीस इन्स्पेक्टर रमेशराव भोसले, माजी पोलीस अधिकारी नारायणराव भोसले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान जंगम, माजी पोलीस कृष्णा भोसले यांचा समावेश होता.
याव्यतिरिक्त, सामाजिक कार्यकर्ते राम भोसले, पोलीस पाटील प्राची मर्चंडे, माजी एसटी कर्मचारी मनीषा भोसले, माजी तंटामुक्त अध्यक्ष विश्वास मर्चंडे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश मर्चंडे, रवींद्र मर्चंडे, आकांक्षा जंगम, अक्षरा मोहिते, ज्योती मोहिते, प्रमिला मोहिते, ज्योती मर्चंडे, अमृता शिर्के, जयश्री निकम आदी ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांना नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात करता आली.

हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, पदवीधर शिक्षक विजय सकपाळ, संदीप घाणेकर आणि शैलेश पराडकर यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा ‘प्रवेशोत्सव’ सोहळा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला.

Total Visitor Counter

2648087
Share This Article