GRAMIN SEARCH BANNER

खेड रेल्वेस्थानक चोरट्यांच्या ‘टार्गेटवर’ : धावत्या एर्नाकुलम एक्सप्रेसमधून मोबाईल चोरी

खेड :  खेड रेल्वे स्थानक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून, नुकतीच एर्नाकुलम एक्सप्रेसमधून प्रवास करत असलेल्या एका तरुणाचा मोबाईल हँडसेट चोरीला गेल्याची घटना घडली आहे. २१ जून २०२५ रोजी रात्री १० वाजल्यापासून २२ जूनच्या पहाटे ६ वाजेपर्यंतच्या दरम्यान, ट्रेन क्र. २२५५६ एर्नाकुलम एक्सप्रेस हजरत निजामुद्दीनहून मडगावकडे जात असताना, खेड रेल्वे स्थानकाजवळ धावत्या गाडीतून अज्ञात चोरट्याने प्रवाशाचा मोबाईल चोरला.

फिर्यादी उदय दिपक कुमार (वय १८, मूळ रा. हाऊस नं. २४४, निवाडी रोड, फत्तेगड साहिब, उत्तरप्रदेश) हे झोपेत असताना, त्यांच्याकडील रियलमी कंपनीचा गडद निळ्या रंगाचा सी-५५ मॉडेलचा मोबाईल हँडसेट, किंमत अंदाजे ७,००० रुपये, अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (क) अन्वये गु.र.नं. २१८/२०२५ नुसार ६ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ वाजून २१ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, खेड रेल्वे स्थानक परिसरात चोरीच्या अनेक  घटना घडल्या आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रेल्वे प्रशासनाने तातडीने सुरक्षाव्यवस्था वाढवावी, अशी मागणी होत आहे. चोरटे प्रवाशांच्या झोपेचा वा गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल, बॅग, पाकिटे यावर डोळा ठेवत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. स्थानिक पोलिसांनी चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

2475126
Share This Article