GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये 34 वर्षीय तरुणाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

Gramin Varta
28 Views

चिपळूण : तालुक्यातील मिरजोळी येथील एका ३४ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिपेश संजय कदम (34) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दिपेश कदम याने ३ जुलै २०२५ रोजी चिपळूण येथे विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना तातडीने चिपळूण येथील अपरांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारांसाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले. पुढे, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने आणि अधिक उपचारांची गरज असल्याने त्यांना ८ जुलै २०२५ रोजी रात्री ८.१५ वाजता साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, ९ जुलै २०२५ रोजी पहाटे निधन झाले.

या घटनेची नोंद चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3379162
Share This Article