GRAMIN SEARCH BANNER

लांजा: गोविळ येथे दुचाकीवरील ताबा सुटून अपघात; प्रौढ जखमी

Gramin Varta
136 Views

लांजा: तालुक्यातील गोविळ येथील रस्त्यावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एक तरुण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. बाबूराम पांचू राजपूत (वय ५८, रा. वैभव वसाहत, लांजा) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.

बाबूराम राजपूत हे नेहमीप्रमाणे भंगार गोळा करून गोविळ येथून दुचाकीने जात असताना रस्त्यावर अचानक दुचाकीवरील ताबा सुटला आणि ते अपघातग्रस्त झाले. या अपघातात त्यांना दुखापत झाली. जखमी अवस्थेत बाबूराम यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Total Visitor Counter

3386923
Share This Article