संदीप लाड/ श्रीवर्धन:देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची फेर निवड झाली असून याबाबत त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
देशात सर्वाधिक गतीने मागणी पुरवठा आणि आर्थिक वृद्धीदर असलेल्या पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस क्षेत्रात सुनील तटकरे यांना सन्मानाचे पद मिळाले आहे महाराष्ट्रासह रायगड साठी ही अभिमानाची बाब ठरली असून राज्यसभा व लोकसभेतील 31 खासदारांचा या समितीमध्ये समावेश असून रायगडचे खासदार सुनील तटकरे हे या समितीचे अध्यक्ष झाले आहेत.
सध्या देशातील सर्व क्षेत्रात पेट्रोलियम व नैसर्गिक गॅसच्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ होत आहे दरवर्षी साधारणतः 3 ते 5 टक्के इतका वृद्धीदर या क्षेत्राचा आहे.
देशाच्या आर्थिक वृद्धीदरात या क्षेत्राचे सर्वाधिक योगदान आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार ,परस्पर संबंधांबाबत पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आयात निर्यात धोरण पायाभूत सुविधा आणि औद्योगिक वृद्धीदरात या क्षेत्राचा
अग्रक्रम आहे.
त्यामुळे देशाच्या प्रगती व समृद्धीचा पाया म्हणून पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस महत्वाचे आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस या क्षेत्राला देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंधन व इंजिन मानले जाते त्यामुळेच अनन्यसाधारण महत्व असलेल्या संसदीय समितीच्या अध्यक्षपदाची धुरा खासदार सुनील तटकरे यांच्याकडे आल्याने हा महाराष्ट्राचा सन्मान असल्याचे बोलले जात आहे.