GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात दुचाकी जळलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ ; पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
415 Views

राजापूर : राजापूर–धारतळे मार्गावरील गिरमादेवी कोंड थांबा येथे एक दुचाकी जळालेल्या अवस्थेत आढळून आली असून या प्रकरणी राजापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गाडी क्रमांक एमएच 04 जीडब्ल्यू 6354 असलेली ही कार 15 नोव्हेंबर रोजी गायब झाल्याची तक्रार दत्ताराम तरळ यांनी राजापूर पोलिस ठाण्यात नोंदवली होती. रविवारी, 16 नोव्हेंबर रोजी गिरमादेवी परिसरात रस्त्याच्या कडेला जळालेली दुचाकी दिसून आली. जळालेल्या वाहनाचा रंग आणि अवशेष पाहता, ती तक्रारीतीलच गाडी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या घटनेनंतर राजापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती दिली.

Total Visitor Counter

3370001
Share This Article