GRAMIN SEARCH BANNER

एसआरके तायक्वांदो क्लबचा गुणगौरव सौहळा संपन्न

ऑफिशियल वेबसाईट व स्वतंत्र ॲपचे ओपनिंग

रत्नागिरी:  21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता एसआरके तायक्वांदो क्लब रत्नागिरीतर्फे गुणवंत खेळाडू गुणगौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमांमध्ये 2025-26 वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल 40 गुणवंत  खेळाडूंना गौरव चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच या चाळीस विद्यार्थ्यांमध्ये 5 अवॉर्ड देखील देण्यात आले.

स्वरा साखरकर (प्लेयर ऑफ द इअर)
स्वरा साखळकर (मोस्ट चॅम्पियनशिप प्लेअर)
अरवी नार्वेकर(मोस्ट कन्सिस्टन्सी प्लेअर)
स्पृहा सावंत (मोस्ट सिन्सीअर प्लेअर)
अर्जुन पवार (अपकमिंग प्लेअर) त्याचबरोबर श्रुती चव्हाण, स्वरा साखळकर, मृदुला पाटील या तीन राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
   
त्यानंतर एसआरके तायक्वांदो क्लबचे ऑफिशियल वेबसाईट व स्वतंत्र उद्घाटन नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. एक आधुनिक डिजिटल प्रणाली आहे जी क्लबचे काम अधिक सोपे, व्यवस्थित आणि जलद करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या सिस्टममध्ये पब्लिक वेबसाईड आणि ॲडमीन मोबाईल ॲप या दोन मुख्य भागांचा समावेश आहे. सार्वजनिक वेबसाइटवर क्लबची माहिती, विद्यार्थ्यांची अचिवमेंट्स, स्पर्धांचे फोटो, गॅलरी आणि महत्त्वाचे अपडेट्स सहज पाहता येतात. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी कधीही व कुठूनही क्लबशी जोडलेले राहू शकतात आणि विद्यार्थ्यांच्या यशाची सर्वांसमोर माहिती मिळते.

दुसरीकडे, ग्रुप ॲडमीन ॲप च्या मदतीने प्रशिक्षक आणि अ‍ॅडमिन मोबाईलवरूनच विद्यार्थ्यांची माहिती व्यवस्थापित करू शकतात, उपस्थिती नोंद करू शकतात, आणि नवीन फोटो किंवा अचिवमेंट्स लगेच वेबसाइटवर अपडेट करू शकतात. यामुळे कागदी नोंदीची गरज कमी होते आणि सर्व माहिती सुरक्षितपणे डिजिटल स्वरूपात जतन होते.

या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना अनेक फायदे मिळतात. त्यांच्या उपस्थितीची योग्य नोंद ठेवली जाते, त्यांच्या प्रगतीची माहिती व्यवस्थित जतन होते, त्यांच्या अचिवमेंट्स सर्वांना पाहता येतात आणि त्यांना वेळेवर महत्त्वाचे अपडेट्स मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रेरणा मिळते आणि त्यांना एक आधुनिक व व्यवस्थित क्रीडा प्रशिक्षणाचा अनुभव मिळतो.
कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा मा शिल्पा सुर्वे जिल्हा परिषद सदस्य प्रीती सुर्वे, नगरसेविका सौ पूजा पवार, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे कोषाध्यक्ष शशांक घडशी, आंतरराष्ट्रीय खेळाडू ऐश्वर्या सावंत, क्लब अध्यक्ष अमोल सावंत नियोजन समिती प्रमुख प्रफुल्ल हातिसकर प्रशिक्षक शाहरुख शेख आदी मान्यवर उपस्थित होते. 

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अम्रिता केतन वारणकर, सीटी राईड, मधुसूदन भुर्के, विलास अनंत चव्हाण, रोशन दामोदर मयेकर, साहिल राजेंद्र मयेकर, अमेय विरकर(अमेय ज्वेलर्स), विद्या धोत्रेकर यांचे सहकार्य लाभले. राधीका कुंडकर, शुभांगी तापेकर, सांची पाटील यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

Total Visitor Counter

3486470
Share This Article