GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : खड्ड्यात आदळून जखमी झाल्याने दुचाकीस्वारावर गुन्हा

Gramin Varta
311 Views

चिपळूण : रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी अडखळून झालेल्या अपघातप्रकरणी दुचाकीस्वारावर मंगळवारी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर शंकर धावडे (वय ३९, रा. काजरकोड, सावर्डे) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी अमोल सुभाष गुढेकर (वय ३२, रा. सावर्डे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर धावडे हे आपल्या दुचाकीवरून काजरकोड ते डेरवण फाटा या मार्गावरून विनाहेल्मेट प्रवास करत होते. दरम्यान, वरदाय हॉटेलसमोर रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी अडखळल्याने ते खाली पडले. या अपघातात त्यांना दुखापत झाली. या घटनेची नोंद घेत सावर्डे पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3366863
Share This Article