GRAMIN SEARCH BANNER

गावखडी येथील वृद्धेचा जिल्हा रुग्णालयात आकस्मिक मृत्यू

Gramin Varta
48 Views

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी येथील एका ८० वर्षीय वृद्धेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला असून, याप्रकरणी मंगळवारी पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनुसया महादेव कुंभार (वय ८०, रा. गावखडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत वृद्धेचे नाव आहे.

याप्रकरणी त्यांचा नातू प्रथमेश रामचंद्र कुंभार याने पोलिसांना माहिती दिली. अनुसया कुंभार यांना गेल्या काही दिवसांपासून खोकला आणि अशक्तपणाचा त्रास जाणवत होता. अंगातील ताकद कमी झाल्याने सोमवारी (दि. २२) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या चुलत पुतण्याने त्यांना खाजगी गाडीने रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Total Visitor Counter

3370202
Share This Article