रत्नागिरी: शहरातील मिरकरवाडा खडकमोहल्ला परिसरात वादातून एका तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मिरकरवाडा येथे जमल्याचे दिसून येत आहे. ज्या तरुणाने खून केला त्याला पोलिसांनी तत्काळ पकडल्याचे ही समजते. सदर तरुणाला भोसकून खून केल्याचे समोर येत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील हे आपल्या टीम सह दाखल झाले आहेत. पुढील सविस्तर बातमी लवकरच….
ब्रेकिंग: मिरकरवाडा येथे तरुणाचा खून
