GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : प्रा. डॉ. पांडुरंग पाटील यांना सर्वोत्कृष्ट संशोधन निधी आणि नावीन्य पुरस्कार प्रदान

Gramin Varta
27 Views

रत्नागिरी: मुंबई विद्यापीठातर्फे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात संशोधन प्रकल्प अनुदान मिळवणाऱ्या मान्यवरांमध्ये रत्नागिरी उपकेंद्रातील पर्यावरणशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. पांडुरंग यशवंत पाटील यांचा समावेश आहे.

मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ साठीचे संशोधन, आदर्श शिक्षक, तसेच अन्य पुरस्कार यांचे वितरण करण्यात आले. प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ. पाटील यांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात डॉ. पांडुरंग पाटील पर्यावरणशास्त्र विभागात एम.एस्सी पर्यावरणशास्त्र विषयासाठी सहयोगी प्राध्यापक व पीएचडी मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पूर्ण केली असून ते देश-विदेशात काम करत आहेत. हवा प्रदूषण विषय व क्षेत्रामध्ये त्यांना एनएएक्यूएमअंतर्गत प्रकल्प प्रमुख म्हणून उल्लेखनीय कार्य करत आहेत. हा पुरस्कार संशोधनविषयक अनुदान मिळवण्याच्या शिक्षकांमधून डॉ. पाटील यांची निवड करण्यात आली.

डॉ. पाटील यांना त्यांचे संशोधन सहाय्यक, विद्यार्थी, तसेच विद्यापीठ व महाविद्यालयांमधील अनेकांचे सहकार्य मिळाले. उपपरिसर संचालक डॉ. किशोर सुखटणकर, अभिनंदन बोरगावे, सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.

Total Visitor Counter

3366905
Share This Article