GRAMIN SEARCH BANNER

खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीवर्धन मध्ये पाककला स्पर्धा संपन्न झाली

Gramin Varta
102 Views

श्रीवर्धन/संदीप लाड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष,तथा लोकप्रिय खा. सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंत्री अदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून व अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन शहरातील माळी समाज मंदिर  येथे भव्य पाककला स्पर्धा २०२५  संपन्न झाली.यावेळी श्रीवर्धन तालुक्यातील १२५ स्पर्धक महिलांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट विविध प्रकारचे चविष्ट शाकाहारी पदार्थ बनवून आणले होते .

यावेळी पाककला स्पर्धेला राष्ट्रवादी महिला काँग्रेस रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रविता माने तालुका अध्यक्षा सबा फिरफिरे  शहर अध्यक्षा,राजसी मुरकर निरीक्षक गौरी पोतदार माजी नगराध्यक्ष कविता सातनाक,शबिस्ता सरखोत,दिशा नागवेकर,रुची बोरकर, वालवटी सरपंच नुहा डांगु, सायगाव सरपंच स्वाती निगुडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली, या स्पर्धेत पहिला क्रमांक पल्लवी साठे श्रीवर्धन दुसरा क्रमांक उज्वला संतोष यवतकर श्रीवर्धन तिसरा क्रमांक अमिना सुहेल मुकादम बोर्ली व उत्तेजनार्थ स्नेहल रेठरेकर व श्रेया खोत यांचा आला यावेळी बहुसंख्येनी महिला स्पर्धक व श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी  मान्यवर उपस्थित होते.

Total Visitor Counter

3369175
Share This Article