GRAMIN SEARCH BANNER

सासऱ्याला विष देणाऱ्या सुनेला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Gramin Varta
29 Views

देवरुख: जेवणात विषारी द्रव मिसळून सासऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सुनेला सोमवारी देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले असता, तिला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. देवरुख पोलिस ठाण्यातून ही माहिती प्राप्त झाली आहे.

कोसुंब रेवाळेवाडी येथे ही खळबळजनक घटना घडली होती. घरातील कामे करण्यास सांगण्याच्या रागातून सून स्वप्नाली साळवी-सोलकर हिने सासरे जगन्नाथ सोलकर यांना जेवणामध्ये विषारी द्रव टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हे विषारी द्रव असलेले जेवण सेवन केल्याने जगन्नाथ सोलकर आणि साळवी सोलकर या दोघांनाही विषबाधा झाली होती.

या प्रकरणी मिळालेल्या फिर्यादीनुसार, स्वप्नालीवर देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली होती. शनिवारी तिला देवरुख न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. ती कोठडी संपल्यानंतर सोमवारी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयाने तिला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Total Visitor Counter

3367377
Share This Article