GRAMIN SEARCH BANNER

पावसमध्ये ईद-ए-मिलादचा उत्साह; भव्य मिरवणुकीत मुस्लिम बांधवांचा सहभाग

Gramin Varta
13 Views

गावखडी, (वार्ताहर) : इस्लाम धर्मात विशेष महत्त्व असलेल्या ईद-ए-मिलादचा सण पावस येथील जमातुल मुस्लिमीन दखनी मोहल्लातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण दिसून आले.

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पावसमध्ये विशेष सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. या सणाच्या निमित्ताने जमातुल मुस्लिमीन दखनी मोहल्लातर्फे हजरत शेख महंमद पीर दर्गा येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक काझी मोहल्ला आणि दखनी मोहल्लातून फिरून जामा मस्जिद, दखनी मोहल्ला येथे पोहोचली.
हा दिवस मुस्लिम समाजात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मिरवणुकीनंतर जामा मशिदीमध्ये ईद-ए-मिलादचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

हा संपूर्ण कार्यक्रम शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जमातीचे अध्यक्ष वसीम शौकत म्हालदार, रिझवान रोशनखान फडनाईक, दाऊद म्हामूद मुजावर, फैजल दाऊद झारी, इक्बाल अ. फडनाईक यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच, पावस पोलीस स्टेशनच्या हेड कॉन्स्टेबल सोनाली शिंदे आणि पूर्णगड पोलीस स्टेशनचे महेश कुबडे यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

या सोहळ्याचे छायाचित्रण दिनेश पेटकर यांनी केले असून, त्यात पावस येथील ईद-ए-मिलादच्या भव्य मिरवणुकीचे आणि मुस्लिम बांधवांच्या सहभागाचे दृश्य टिपले आहे.

Total Visitor Counter

3375688
Share This Article