GRAMIN SEARCH BANNER

दादर-रत्नागिरी रेल्वेसेवा पाच वर्षांपासून बंदच; कोकणवासियांचे हाल

Gramin Varta
219 Views

मुंबई : मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि पालघर जिल्ह्यातील कोकणवासियांसाठी उपयुक्त असलेली दादर-रत्नागिरी रेल्वे सेवा करोना काळात मध्य रेल्वेने बंद केली. त्यानंतर करोना, टाळेबंदी संपली, तरी, दादर – रत्नागिरी रेल्वे सेवा सुरू झाली नाही.

गेल्या पाच वर्षांपासून ही रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. बाहेरील राज्यातील रेल्वेगाड्या मुंबईत आणणे सुरू आहे. पण त्याच वेळी कोकणातील रेल्वेगाडी मुंबईच्या वेशीवर थांबविण्यात येत आहेत.

रत्नागिरी – लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावर १९९६-९७ पासून पॅसेंजर गाडी सुरू झाली. पुढे प्रवाशांच्या मागणीनुसार ती रत्नागिरी – दादर पॅसेंजर म्हणून चालवली जाऊ लागली. मार्च २०२० पर्यंत ही गाडी प्रवाशांच्या सेवेत होती. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वसई, नालासोपारा, विरार आणि गुजरात दिशेने ये – जा करणाऱ्या प्रवाशांना दादर स्थानक सोयीचे असल्यामुळे आणि दिव्यापुढे सर्व स्थानकांवर थांबत असल्यामुळे ही गाडी लोकप्रिय ठरली होती.

करोनाच्या नावाखाली मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२१ पासून मार्गाची क्षमता नसल्याचे आणि वक्तशीरपणाचे कारण देत दादर – रत्नागिरी सेवा बंद केली. तर, नवीन शून्य आधारित वेळापत्रकात दिवा – रत्नागिरी पॅसेंजर सुरू केली. परंतु, रत्नागिरी पॅसेंजरच्या वक्तशीरपणात काहीही बदल झाला नाही. गेल्या पाच वर्षांपासून कोकणातील सर्व नागरिकांनी विविध माध्यमांतून रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे दादर रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली. तसेच सकाळच्या वेळी दादर – चिपळूण जलद पॅसेंजर सुरू करण्याची मागणी मागील १० ते १५ वर्षांपासून करण्यात येत आहे.

परंतु त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. लोकप्रतिनिधींनी वारंवार थेट रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करूनही काही उपयोग झाला नाही. मार्च २०२३ मध्ये तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या होत्या. या बैठकीला आमदार व विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड व आमदार गणपत गायकवाड उपस्थित होते. तसेच उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, राज्याचे मंत्री व भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आदींनी वेळोवेळी रेल्वे प्रशासन व रेल

मध्य रेल्वे मार्गाच्या क्षमतेचे कारण पुढे करून राज्यांतर्गत रेल्वेगाडी मुंबईच्या वेशीवर थांबवण्यात येते. तर, मुंबई – बेंगळुरूदरम्यान नवीन अतिजलद गाडी सुरू होणार आहे. रत्नागिरी पॅसेंजरसाठी मार्गाची क्षमता नसेल तर, या इतर रेल्वेगाड्यांसाठी मार्ग कसा मोकळा होतो, असा प्रश्न समितीने उपस्थित केला. रत्नागिरीची गाडी मुंबईबाहेर थांबवून त्या जागी इतर गाड्या सुरू करणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला थेट आव्हान देण्यासारखे आहे. याला आमचा ठाम विरोध आहे. – अक्षय महापदी, सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती

Total Visitor Counter

3206621
Share This Article