GRAMIN SEARCH BANNER

दापोली : सोंडेघर येथे लोखंडी चॅनलची चोरी; अज्ञातावर गुन्हा

Gramin Varta
25 Views

दापोली : तालुक्यातील सोंडेघर धरणाजवळ लोखंडी चॅनल चोरीची घटना घडली असून, या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २९ जुलै सायंकाळी ६ ते ३० जुलै सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोंडेघर येथील जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या विहिरीतील मोटार टाकण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी चॅनल अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. सदर चॅनल २ फूट रुंद व २० फूट लांबीचा असून त्याची अंदाजे किंमत १० हजार रुपये आहे.

या चोरीची तक्रार सतीश चुन्नीलाल मेहता (वय ५६, रा. माटवण) यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास दापोली पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3369517
Share This Article