मुंबई:राज्य सरकारकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविली जात असून या योजनेअंतर्गत दरमहा पात्र महिलांना १५०० दिले जात आहे. मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला यामुळे जून महिन्याचा आता कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागून आहे.
मात्र याच दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी लाडक्या बहिणींना लगेच पुढचा हप्ता मिळणार आहे, असे सांगितले आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या पुढच्या हप्त्याची माहिती दिली आहे. अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने नुकतेच एकूण 3600 कोटी रुपये डीबीटी खात्यावर ट्रान्सफर केले आहेत.
आता उद्यापासून म्हणजेच 30 जून रोजीपासून लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. त्याची प्रक्रिया चालू झाली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.