लांजा / अरबाज नेवरेकर: लांजा येथील संकल्पसिद्धी हॉलमध्ये लांजा पोलिस ठाण्याच्या वतीने पोलीस पाटील, गुरांच्या गोठ्यांचे मालक, गुरे पाळणाऱ्या व्यक्ती तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन करून संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
‘नशामुक्त महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत शालेय व महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा यावेळी प्रशस्तीपत्रक व चषक देऊन सत्कार करण्यात आला. माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक कु. मनस्वी रामकृष्ण कुलकर्णी, द्वितीय क्रमांक कु. रुद्र संजय वीर तर तृतीय क्रमांक कु. संस्कार संजय चव्हाण यांनी मिळवला. तसेच उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. उच्च माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक कु. तनिषा संदीप वालकर, द्वितीय क्रमांक कु. राखी गंगाराम झोरे, तृतीय क्रमांक कु. आकांक्षा बिलाल तांबोळी यांच्यासह उत्तेजनार्थ क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
पोलीस विभागाच्या कामकाजात सहकार्य करणाऱ्या महिला सुरक्षा व दक्षता समितीच्या सदस्यांचाही यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. तसेच शहरातील व रस्त्यांवर गुरे मोकाट सोडणाऱ्या गुरे मालकांना कायदेशीर बाबी समजावून सांगण्यात आल्या. मोकाट गुरांमुळे वाहतुकीला निर्माण होणारा धोका तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या.
या बैठकीला लांजा पोलीस निरीक्षक बगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मैंदाड, पोलीस उपनिरीक्षक सरंगळे, पोलीस हवालदार जाधव, महिला पोलीस हवालदार शेडे, महिला पोलीस हवालदार मांजरे, पोलीस कॉन्स्टेबल राणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल राणे यांच्यासह संबंधित नागरिक, विद्यार्थी व समितीच्या सदस्या उपस्थित होत्या.
लांजा पोलिसांकडून विद्यार्थी, पोलीस पाटील व गोठा मालकांची बैठक; घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार
Leave a Comment





