GRAMIN SEARCH BANNER

प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलची झलक पाहण्यासाठी राजापुरात चाहत्यांची अलोट गर्दी

Gramin Varta
174 Views

राजापूर: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिने शुक्रवारी राजापूर शहरात हजेरी लावल्याने तिला पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. एका सुपर मार्केटच्या नव्या दालनाच्या उद्घाटन निमित्ताने ती शहरात आली असता, तिचे हलगीच्या तालावर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील जवाहर चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिने अभिवादन केले. आपल्या लाडक्या कलाकाराला प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि तिची एक झलक टिपण्यासाठी शहरात ठिकठिकाणी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती, ज्याला गौतमीनेही सुहास्य वदनाने प्रतिसाद देत उपस्थितांचे अभिवादन स्वीकारले.

दरम्यान, गौतमी पाटीलच्या या दौऱ्यात निसर्गाचाही व्यत्यय पाहायला मिळाला. सायंकाळी उशिरा आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला तिने उपस्थिती लावली, मात्र याच दरम्यान शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या तडाखेबाज पावसामुळे कार्यक्रमाच्या नियोजित वेळेत अडथळा निर्माण झाला. पावसाचे सावट गडद झाल्याने या कार्यक्रमाला अपेक्षेप्रमाणे मोठा प्रतिसाद मिळू शकला नाही. तरीही गौतमीच्या आगमनामुळे दिवसभर राजापूर शहरात उत्साहाचे वातावरण होते आणि सोशल मीडियावरही तिच्या या भेटीचे फोटो व व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

Total Visitor Counter

3388768
Share This Article