GRAMIN SEARCH BANNER

कामथे उपजिल्हा रुग्णालयात नूतन नेत्र शस्त्रक्रिया गृहाचा शुभारंभ

Gramin Varta
81 Views

पहिली शस्त्रक्रिया डॉ. सुनील डोखळे यांच्या हस्ते; आधुनिक नेत्रसेवेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

चिपळूण : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या संकल्पना आणि मार्गदर्शनातून कामथे (ता. चिपळूण) येथील उपजिल्हा रुग्णालयात नूतन नेत्र शस्त्रक्रिया गृह सुरू करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला.

या नव्या उपक्रमाची प्रत्यक्ष सुरुवात नेत्रशल्यचिकित्सक डॉ. सुनील डोखळे यांनी पहिली नेत्र शस्त्रक्रिया करून औपचारिक उद्घाटन करत केली. अत्याधुनिक नेत्रसेवा सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम मोठे पाऊल मानला जात आहे.

या यशस्वी सुरुवातीसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. असितकुमार नरवाडे, इन्चार्ज सिस्टर, तसेच रुग्णालयातील सर्व स्टाफ आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

लवकरच डॉ. पवन सावंत, डॉ. सुनील डोखळे यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक यंत्रसामुग्री, अत्याधुनिक उपकरणे आणि नवीन नेत्र शल्यचिकित्सकांच्या टीमसह नेत्ररुग्णांसाठी अधिक व्यापक सेवा सुरू होणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

या सुविधेमुळे ग्रामीण भागातील शेकडो नेत्ररुग्णांना स्थानिक स्तरावर उच्च गुणवत्तेची, सुरक्षित आणि विश्वासार्ह नेत्रसेवा उपलब्ध होणार आहे.

Total Visitor Counter

3379938
Share This Article