GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : फणसवळे येथील तरुणाचा विषारी औषध प्यायल्याने मुंबईत मृत्यू

Gramin Varta
17 Views

संगमेश्वर : तणनाशक औषध प्यायल्याने गंभीर झालेल्या संगमेश्वर तालुक्यातील एका २३ वर्षीय तरुणाचा मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य बळीराम मोर्डेकर (वय २३, रा. म. फणसवळे, पो. देवळे, ता. संगमेश्वर) असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याने तणनाशक औषध पिल्याची बाब कुटुंबियांपासून लपवली होती, मात्र प्रकृती बिघडल्यानंतर ही बाब समोर आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य मोर्डेकर याने २५ जुलै रोजी कुणालाही काहीही न सांगता तणनाशक औषध सेवन केले. दुसऱ्या दिवशी, २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता त्याने आपल्या आईला घशात जळजळ होत असल्याचे आणि त्रास होत असल्याचे सांगितले. तात्काळ त्याला उपचारासाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी त्याला मुंबईला हलवण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार, २८ जुलै रोजी रात्री ११ वाजता त्याला मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू असताना, ५ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता त्याने स्वतः आपल्या आईला तणनाशक औषध पिल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू ठेवले, परंतु १० ऑगस्ट रोजी रात्री ८.४५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेने मोर्डेकर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3073033
Share This Article