GRAMIN SEARCH BANNER

मंडणगड : गांजा सदृश अमली पदार्थासह दोघे अटकेत, एक फरार

Gramin Varta
147 Views

मंडणगड : गांजा सदृश ५५ ग्रॅम वजनाचा आणि सुमारे ८२ हजार ५०० रुपयांचा अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून एक जण घटनास्थळावरून फरार झाला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये इम्रान फारुख देवरुखकर (२५), मोहम्मद जावेद जफीर अन्सारी (३४) आणि अतिक एजाज कोंडकर (२२, सर्व रा. पुंबळे) यांचा समावेश आहे. पोलिसांनी इम्रान देवरुखकर आणि मोहम्मद अन्सारी यांना ताब्यात घेतले असून अतिक कोंडकर फरार झाला आहे.

हेडकॉन्स्टेबल संबंधदास प्रताप मावची यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ६ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजता पुंबळे बाजारपेठेतील एका दुकानाच्या आतील भागात पोलिसांनी छापा टाकला असता तिघेही गांजा सदृश अमली पदार्थ विक्रीसाठी तयार असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून ५५ ग्रॅम वजनाचा हिरव्या आणि काळ्या रंगाचा पाला, फुले, काड्या आणि बोंड असलेला पदार्थ, अशा स्वरूपातील पाच छोट्या पारदर्शक पिशव्या जप्त केल्या. या मुद्देमालाची एकूण किंमत ८२,५०० रुपये असून त्यात एक काळसर चिलीम आणि एक लायटर यांचाही समावेश आहे.

या प्रकरणी मंडणगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3281910
Share This Article