GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे उपकेंद्र 

Gramin Varta
7 Views

संस्कृत उपकेंद्राला 1 एकर जागा देण्याचा निर्णय – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचे उपकेंद्र रत्नागिरीत स्थापन करण्याबरोबरच रत्नागिरीतील संस्कृत उपकेंद्राला 1 एकर जागा देण्याचा निर्णय घेतानाच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित गुणपत्रिका तात्काळ द्यावेत, अशी सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.

पालकमंत्री डॉ. सामंत यांनी आज सकाळी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात महाविद्यालयासह शासकीय तंत्रनिकेतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कौशल्य विकास केंद्र, संस्कृत अद्यायन उपकेंद्र, शासकीय परिचारिया महाविद्यालय, औषधनिर्माण महाविद्यालय यांची तब्बल तीन तास आढावा बैठक घेतली. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्राचार्य यु.व्ही. पाटील, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्यासह अन्य  महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.व्ही. काळे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सविस्तर आढावा घेतला. महाविद्यालयाच्या ज्या मुलांचे गुणपत्रक, प्रोव्हीजन प्रमाणपत्र विद्यापीठाकडे प्रलंबित आहेत ते तात्काळ विद्यापीठाने देण्यात यावे, अशी सूचना दिली. अल्पसंख्याक मुलींना वसतिगृहात प्रवेश देण्यासाठी प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी समिती नेमण्यात आली. अपर जिल्हाधिकारी श्री. गलांडे यांनी दर दोन महिन्यांनी बैठक घेऊन महाविद्यालयांचा आढावा घ्यावा. नाविन्यपूर्ण योजनेमधून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना ॲपरन आणि बुट देण्याबाबतचा प्रस्ताव द्यावा. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीकोनातून कॅम्पस मुलाखतींचे आयोजनही करावे, असे पालकमंत्री म्हणाले.

Total Visitor Counter

2648118
Share This Article