कराड : पाटण तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिचा क्रूरपणे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. खून केल्यानंतर मुलीचा मृतदेह वाजेगाव (ता. पाटण) परिसरात कोयना नदीकाठी जमिनीत पुरल्याचेही संशयिताने कबूल केले.
या आरोपीस अटक केली असून, न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी दिली आहे. या खून प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
संशयित ज्ञानदेव तुकाराम सुतार (वय ३७, मूळ रा. वाटोळे-पाटण, सध्या रा. विरार, मुंबई) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून ठाणेनगर पोलिसांनी शिताफीने अटक करून कोयना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या खून प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
पाटण पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ज्ञानदेव सुतारने पीडित मुलीचे अपहरण केल्याची तक्रार कोयनानगर पोलिसात दाखल केली होती. या घटनेबाबत ठाणे पोलिसांनी संशयित आरोपी ज्ञानदेव सुतारला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. संबंधित मुलगी गरोदर राहिल्याने बदनामीच्या भीतीने तिचा खून केला. कोयनानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाजेगावच्या हद्दीत त्याने संबंधित मुलीचा खून करून तिचा मृतदेह रस्त्यालगत नदीकाठी खड्ड्यात पुरून टाकला. सदरची माहिती मिळताच सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाल कडुकर यांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथक ठाणे पोलीस ठाण्यात दाखल झाले. या पथकाने संशयितास ताब्यात घेऊन कोयनानगर पोलिसांत हजर केले.
संशयित आरोपी ज्ञानदेव सुतारकडे पोलिसांनी तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ज्ञानदेव सुतारची रीतसर पोलीस कोठडी घेऊन आरोपीने सांगितलेल्या घटनास्थळी अल्पवयीन मुलीचा मृतदेह उत्खनन करून ताब्यात घेण्यात आला आहे. ज्ञानदेव सुतारने समाजातील बदनामीच्या भीतीने अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून करून मृतदेह पुरल्याचे सांगितले. कोयनानगरचे सहायक पोलीस निरीक्षक एस. के. ओलेकर अधिक तपास करत आहेत.
आरोपी सुतार याला ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून ठाणेनगर पोलिसांनी शिताफीने अटक करून कोयना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. संबंधित मुलगी गरोदर राहिल्याने बदनामीच्या भीतीने तिचा खून केला. या खून प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
कराड : पाटण तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण; खुनाची घटना उघडकीस
