GRAMIN SEARCH BANNER

सावर्डे येथे भीषण अपघातात तरुणीचा दुर्दैवी अंत

Gramin Varta
41 Views

रत्नागिरी, (प्रतिनिधी): चिपळूण तालुक्यातील तुरंबव फाट्याजवळ एका मॅक्स गाडीला मोटारसायकलने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका १७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.मोटारसायकलस्वार वडीलही या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना ४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मॅक्स गाडीचे चालक प्रशांत कृष्णाजी पंडित (वय ५०, रा. तुरंबव, चिपळूण) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, प्रशांत पंडित हे त्यांची मॅक्स गाडी (क्र. MH १० E.७९४०) घेऊन मांडकीहून तुरंबवच्या दिशेने येत होते. तरंबव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका टर्नर कंपनीच्या मोटारसायकलने (क्र. MH ०२ BC.१२२५) त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारसायकल चालक निलेश विनायक नाचरे (वय ४७, रा. निवळी, चिपळूण) यांनी रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे हा अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती की, मोटारसायकलवर मागे बसलेली त्यांची मुलगी या अपघातात गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात मोटारसायकल चालक निलेश नाचरे हे स्वतःही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.

प्रशांत पंडित यांच्या तक्रारीनंतर सावर्डे पोलिसांनी आरोपी निलेश नाचरे यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

2648121
Share This Article