सावर्डे (वार्ताहर) चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे केदारनाथ बहुउद्देशीय हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड सावर्डे आयोजित दिवाळी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. ११ आणि १२ ऑक्टोबर या दोन दिवसांत दुपारी ३ ते संध्याकाळी ७ या वेळेत स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या महोत्सवात दिवाळी खरेदीसाठी आवश्यक सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होत्या. तयार कपडे, ड्रेस मटेरिअल, साड्या, फराळासाठी लागणारी पीठे, तयार फराळ, आकाशकंदील, पणत्या, मेणबत्त्या, रांगोळीचे रंगसाहित्य आणि विविध सजावटीच्या वस्तूंनी ग्राहकांना आकर्षित केले.
याशिवाय, चटपटीत खाऊच्या स्टॉल्सनी खरेदीचा आनंद द्विगुणित केला. स्थानिक महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीही केली, ज्यामुळे स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन मिळाले.
कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड च्या उपाध्यक्ष्या अनुजा राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सावर्डे जिजाऊ ब्रिगेड च्या कार्यकर्त्या शर्मिला सकपाळ माया गुहागरकर , ऋतुजा देवळेकर, आदिती अमोल निकम , उद्योजग पल्लवी सावंत, जागृती लाड, वर्षा खानविलकर, प्रिया विचारे , दर्शना पाटील आणि इतर महिलांनी अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहवर्धक वातावरणात आयोजन केले .नागरिकांनी “एकाच ठिकाणी संपूर्ण दिवाळी खरेदी” या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद दिला.
यावेळी स्थानिक सावर्डे परिसरातील आणि चिपळूण शहरातील महिलांनी स्वतःच्या उत्पादनांची मोठी उलाढाल केली . तसेच सावर्डे परिसरातील हजारो नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला . महिलांनी महिलांसाठी स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात उभारलेला हा पहिलाच महोत्सव यशस्वी झाल्याबद्दल
आयोजक सावर्डे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सर्व नागरिकांचे आभार मानण्यात आले आणि यापुढील कालावधी मध्ये आणखी मोठ्या स्वरूपात हा महोत्सव आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त यावेळी, अंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड च्या आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष अनुजाराजे भोसले यांनी व्यक्त केला . आमदार शेखर निकम यांनी हा कारकमासाठी सहकार्य केल्या बद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी युगंधरा राजेशिर्के, मा. सभापती पूजाताई निकम, प्राचार्य मंगेश भोसले, पत्रकार विनायक सावंत, सई शेकर निकम, पूर्वा निकम, पत्रकार उप सरपंच संदीप घाग यांनी भेट दिली आणि उद्घाटनसमई उपस्थित होते…
⸻