GRAMIN SEARCH BANNER

भाजप नेते तथा वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव यांचा वाढदिवस दणक्यात साजरा

Gramin Varta
160 Views

भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हितचिंतकांची शुभेच्छांसाठी लोटली गर्दी

शुभेच्छानी प्रशांत यादव गेले भारावून!

चिपळूण (प्रतिनिधी):- भाजप नेते तथा वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव यांचा वाशिष्ठी कृषी महोत्सवाच्या नगरीत वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हितचिंतकांची अलोट गर्दी उसळली होती.  या वाढदिवसाच्या शुभेच्छाने प्रशांत यादव  भारावून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.

चिपळूण मधील नामवंत उद्योजक प्रशांत यादव यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात अल्पावधीतच आपले स्थान बळकट केले आहे. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी व सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे. भविष्यात देखील कोकण आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाले पाहिजे, या हेतूने वाशिष्ठी कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिशा देत आहेत. सोमवारी या महोत्सवाचे माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले.

तर या कृषी नगरीत प्रशांत यादव यांच्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन समितीतर्फे नियोजन करण्यात आले होते सुरुवातीला यादव यांच्या सुविद्य पत्नी, चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी यादव यांचे औक्षण केले.  त्यानंतर यादव यांनी आपल्या वाढदिवसाचा केक कापताच उपस्थितीतांनी  एकच जल्लोष केला.


यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हा सहाय्यक निबंधक डॉ. सोपान शिंदे, मुख्याधिकारी विशाल भोसले, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, राजेंद्र महाडिक, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, चिपळूण नागरीच्या संचालिका एडवोकेट नयना पवार, भिलेच्या सरपंच सौ. आदिती गुढेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, राकेश शिंदे, भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, खेर्डी ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया उतेकर, अन्वर जबले, गुलजार कुरवले, कु. स्वामीनी यादव, भाजपा जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, अमोल भोबस्कर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे यांनी करताना भाजप नेते तथा वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या राजकीय व उद्योजकीय क्षेत्राचा आढावा घेतला. तर वाशिष्ठी डेरी प्रकल्पाच्या उभारणीची माहिती देखील दिली.

यावेळी प्रशांत यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तिथेचिंतकांची अलोट गर्दी उसळली होती. ही गर्दी पाहून यादव भारावून गेले. याबद्दल चिपळूण नागरी वाशिष्टी परिवार तसेच यादव कुटुंबीयांनी उपस्थित यांचे आभार मानले आहेत.

आपल्या वाढदिनी मिळालेल्या शुभेच्छा पाहता आपले आणखी जबाबदारी वाढली आहे. आपण हाती घेतलेला जनसेवेचा वसा कमी होऊ देणार नाही, अशी ग्वाही या निमित्ताने प्रशांत यादव यांनी दिली आहे. तर नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आपल्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावलेले भाजप नेते प्रशांत यादव व वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांचा उल्लेख आवर्जून करताना या दोघांनाही धन्यवाद दिले. आपल्या मार्गदर्शनाखाली चिपळूण शहराच्या विकासासाठी योगदान देऊ, अशी ग्वाही दिली.


चौकट

*चिपळूण निवडणुकीतील युतीचे उमेदवार व विजयी शिल्पकरांचा सन्मान*

नुकत्याच झालेल्या चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील शिवसेना-भाजप युतीच्या विजयी उमेदवारांसह निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांचा देखील प्रशांत यादव अभिष्टचिंतन समितीतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच या निवडणुकीत प्रभावीपणे जबाबदारी पार पाडणाऱ्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे चिपळूण नगरपरिषद निवडणुकीची संयोजक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे प्रशांत यादव यांचा देखील विशेष गौरव करण्यात आला. तसेच वाशिष्ठी कृषी महोत्सव यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध आखणी, कल्पकता, दूरदृष्टी ठेवून काम करणाऱ्या व चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत युतीच्या विजयासाठी भाजप नेते प्रशांत यादव यांच्या साथीने मोलाचे योगदान देणाऱ्या वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांचा देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवसेना-भाजप युतीतर्फे गौरव करण्यात आला. यानंतर प्रशांत यादव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Total Visitor Counter

3072963
Share This Article