GRAMIN SEARCH BANNER

आजपासून जीएसटी दर कपातीमुळे सुमारे 375 वस्तू होणार स्वस्त

Gramin Varta
407 Views

दिल्ली: जीएसटी दर कपातीनंतर आता स्वयंपाकघरातील वस्तूंसोबत इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, उपकरणे आणि वाहनांपर्यंत सुमारे 375 वस्तू आज 22 सप्टेंबरपासून (सोमवार) स्वस्त होणार आहेत.जीएसटी काउन्सिलने ग्राहकांना दिलासा देत 22 सप्टेंबरपासून जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तूप, पनीर, लोणी, नमकीन, केचप, जॅम, सुकामेवे, कॉफी आणि आइसक्रीम यासारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंसह, टीव्ही, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन यांसारख्या महागड्या वस्तूही स्वस्त होतील. जीएसटी दरांमध्ये या बदलाच्या पार्श्वभूमीवर एफएमसीजी कंपन्यांनी आधीच आपल्या किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे.

बहुतेक औषधांवर, फॉर्म्युलेशन, ग्लुकोमीटर आणि डायग्नॉस्टिक किटसारख्या वैद्यकीय उपकरणांवर जीएसटी दर आता फक्त 5% झाला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना औषधंही स्वस्त मिळणार आहेत. सिमेंटवर जीएसटी 28% वरून 18% केला गेला आहे, ज्यामुळे घर बांधणाऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे.

सरकारने आधीच औषध दुकानांना जीएसटी दर कपातीनंतर एमआरपी मध्ये बदल करण्याचे किंवा औषधे कमी किमतीत विकण्याचे निर्देश दिले आहेत.जीएसटी दर कपातीतून सर्वात मोठा फायदा वाहन खरेदीदारांना होणार आहे. छोट्या गाड्यांवर जीएसटी 18%, मोठ्या गाड्यांवर जीएसटी 28% असणार आहे. आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे, अनेक कार कंपन्यांनी आधीच आपल्या किमती कमी केल्याची घोषणा केली आहे.

दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर जीएसटी फक्त 5% झाला आहे. केसांच्या तेलावर, साबण, शॅम्पू,टूथब्रश, टूथपेस्ट, टॅल्कम पावडर, फेस पावडर, शेव्हिंग क्रीम, आफ्टरशेव लोशन याही वस्तू लवकरच स्वस्त मिळण्याची शक्यता आहे.

22 सप्टेंबरपासून जीएसटी मध्ये फक्त 2 मुख्य स्लॅब असतील. बहुतेक वस्तू आणि सेवांवर 5% आणि 18% जीएसटी, विलासी वस्तूंवर 40% जीएसटी, तंबाखू आणि संबंधित उत्पादनांवर 28% जीएसटी + उपकर सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत: 5%, 12%, 18%, आणि 28%, पण आता ते दोन मुख्य श्रेणींमध्ये विभागले जातील.

जीएसटी 2.0 मुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दैनंदिन वापराच्या वस्तूंना कमी दराने खरेदी करता येणार आहे, वाहनं स्वस्त होणार आहेत, आणि घर बांधणंही स्वस्त होईल. हे पाऊल अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे.

Total Visitor Counter

2652396
Share This Article