GRAMIN SEARCH BANNER

कोकण रेल्वे मार्गावर २० डिसेंबरपासून विलासपूर-मडगाव साप्ताहिक गाडी

Gramin Varta
228 Views

रत्नागिरी: विलासपूर (छत्तीसगड) ते मडगाव दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर विशेष साप्ताहिक गाडी २० डिसेंबरपासून धावणार आहे.

गोव्याला नाताळ नववर्ष स्वागतसाठी जाणाऱ्या प्रवाशांकरिता ही गाडी सुरू करण्यात येणार आहे.सुट्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ही गाडी सोडण्यात येणार आहे.ही साप्ताहिक विशेष गाडीच्या एकूण ८ फेऱ्या होणार आहेत. मध्य भारत ते कोकण-गोवा असा प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी सोय उपलब्ध झाली आहे.

या विशेष ट्रेनला प्रवासादरम्यान महाराष्ट्रातील आणि कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची खूप सोय होणार आहे. ही गाडी (क्र. ०८२४१) २० डिसेंबर ते १० जानेवारी या काळात दर शनिवारी विलासपूर येथून दुपारी पावणेतीन वाजता सुटेल आणि सोमवारी पहाटे सव्वादोन वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासाकरिता ही गाडी (क्र. ०८२४२) २२ डिसेंबर ते १२ जानेवारी या काळात दर सोमवारी पहाटे साडेपाच वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी, मंगळवारी सायंकाळी ४ वाजता विलासपूरला पोहोचेल. कोकणात ही गाडी कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीला थांबेल.

Total Visitor Counter

3369178
Share This Article