GRAMIN SEARCH BANNER

गयाळवाडी फाट्यावर डंपरची कारला धडक; चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
116 Views

रत्नागिरी / प्रतिनिधी : रत्नागिरी–हातखंबा रस्त्यावरील गयाळवाडी फाटा येथे डंपरने कारला दिलेल्या धडकेत तीन महिलांना दुखापत झाल्याप्रकरणी डंपर चालकावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात ८ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडला होता.

या प्रकरणी विठोबा भागप्पा माने (रा. गुलाबवाटिका अपार्टमेंट, कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे डंपर चालकाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विठोबा माने हा एमएच-०८ बीके ४९७७ क्रमांकाचा डंपर घेऊन रत्नागिरी–हातखंबा मार्गावरून जात असताना गयाळवाडी फाटा येथे त्याचा डंपर कारला जोरात धडकला.

या अपघातात कारमधील स्वरांगी सुरेश पवार (वय ४५), मंजिरी मकरंद परकर (वय ३०) आणि सरोजनी दाजी पवार (वय ६८, रा. आरवली, ता. संगमेश्वर) या तीन महिलांना दुखापत झाली. जखमींना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3379414
Share This Article