तुषार पाचलकर / राजापूर
सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या कार्जिडा गावात शिवसेना (शिंदे गट) शाखेच्यावतीने दिवाळीनिमित्त मोफत आनंदाचा शिधा तसेच ज्येष्ठ नागरिकांना काठीचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थांच्या आनंदात सहभागी होण्याच्या हेतूने शाखा प्रमुख प्रविण आरडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात बोलताना पाचल हायस्कूलचे शिक्षक सिद्धार्थ जाधव म्हणाले, “शासन काय देईल यापेक्षा आपण समाजाचे देणं लागतो, या भावनेतून आयोजित केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून समाजासाठी आदर्शवत आहे.”
या कार्यक्रमाचे आयोजन आमदार किरण उर्फ भैय्याशेठ सामंत आणि अॅड. अपूर्वाई सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार होते. मात्र, अपरिहार्य कारणामुळे त्यांना उपस्थित राहता आले नाही. तरीही जेष्ठ समाजसेवक आप्पा साळवी, शिवसेना युवा तालुका प्रमुख सुनील गुरव आणि विभाग प्रमुख शैलेश साळवी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमाचा लाभ सुमारे २५० ते ३०० ग्रामस्थ व महिलांनी घेतला. कार्यक्रमाला आप्पा साळवी, सरपंच बाबालाल फरास, सिद्धार्थ जाधव, बंड्या बामणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा प्रमुख प्रविण आरडे, प्रकाश आरडे, अमोल आरडे, सुधाकर आरडे, चंद्रकांत पवार, प्रकाश आमकर, नितीन काजारे आदींनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी ग्रामस्थ आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
राजापूर कार्जिडा येथे शिंदे शिवसेना शाखेच्यावतीने आनंदाचा शिधा, काठी वाटप उपक्रम
