GRAMIN SEARCH BANNER

भरधाव दुचाकीची एसटीला धडक; चालक गंभीर जखमी

Gramin Varta
298 Views

रत्नागिरी : बेदरकारपणे दुचाकी चालवत समोरून येणाऱ्या एसटी बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवार, १४ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गावखडी कासार पऱ्या परिसरात घडली.

सुशांत शामराव फोडकर (२५, रा. कशेळी भंडारवाडी, राजापूर) असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रद्धा करळकर यांनी तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत फोडकर हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-बीजे-८३९७) घेऊन गोळप येथून कशेळीच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. गावखडी कासार पऱ्या येथे आल्यानंतर त्याचा तोल जाऊन समोरून येणाऱ्या एसटी बसच्या (एमएच-२०-बीएल-३३१२) मागील उजव्या चाकाजवळ दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात सुशांत गंभीर जखमी झाला असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. पुढील तपास पूर्णगड पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3199502
Share This Article