GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये कार-दुचाकी अपघात; एक जण जखमी

Gramin Varta
21 Views

खेड : मुंबई–गोवा महामार्गावरील वेरळ खोपी फाटा थांब्याजवळ शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. विशाल वामन तांबे (वय ३३, रा. आयनी–बौद्धवाडी) असे जखमीचे नाव आहे.

लोटे येथून आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ०८ एसी ४७४९) घेऊन विशाल तांबे जात असताना चिपळूणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारने (एमएच ०५ व्ही ८५७४) पाठीमागून धडक दिली. या अपघातात तांबे जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Total Visitor Counter

3376073
Share This Article