न्यू. व्हिजन इंग्लीश मिडीयमच्या विविध उपक्रमांचे अनेक स्तरातून कौतुक
शिक्षणाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेने केला प्रयत्न
संगमेश्वर: नवनिर्मिती फाउंडेशन संचलित नियोजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेड बुद्रुक या शाळेच्या वतीने वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या हेतूने शाळा अग्रेसर असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना नुकतेच कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण शाळेच्या वतीने देण्यात आले. या उपक्रमाचे पालकांनी तसेच परिसरातील लोकांनी कौतुक केले.
विद्यार्थी शाळेमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबर वेगवेगळे प्रशिक्षण देणं खूप काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याबरोबर त्यांना उद्योजकतेचे धडे आतापासूनच देणे खूप गरजेचे असून त्यासाठी त्यांच्या हाताला प्रशिक्षण मिळावे हे शाळेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कागदी पिशवी बनवण्याच्या उपक्रम शाळेमध्ये राबवून विद्यार्थ्यांना कागदी पिशवी बनवण्याचे प्रशिक्षण दिले.
यावेळी मुख्याध्यापिका नाझीमा बांगी,उपमुख्याध्यापिका सुजेन अलजी, शिक्षक कौस्तुभ धनावडे, ऋषभ खंदारे, आकलीमा परदेशी, अलीशा पाठणकर, समीक्षा फेपडे, विदिशा कांबळे, कुदसीया मोडक
तसेच सर्व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.