GRAMIN SEARCH BANNER

खेड : वॉशिंग मशिन बिघडल्यावर दुरुस्तीला तुझा मुलगा पैसे देत नाही, असे म्हणत पतीची पत्नीला मारहाण, पतीवर गुन्हा

Gramin Varta
145 Views

खेड : मशिन बिघडल्यावर दुरुस्तीला तुझा मुलगा पैसे देत नाही, असे म्हणत पतीची पत्नीला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कोतवली-भोईवाडी येथे घडली. या घटनेनंतर पीडित महिलेकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, खेड पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रभागा चंद्रकांत लवंदे (वय ७०) या घरी कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिन पाण्याने भरत होत्या. त्यावेळी त्यांचे पती चंद्रकांत लक्ष्मण लवंदे यांनी मशिन लावले नाही म्हणून त्यांच्याशी वाद घातला. “मशिन बिघडल्यावर दुरुस्तीला तुझा मुलगा पैसे देत नाही, आता नळावर कपडे धू” असे म्हणून त्यांनी शिवीगाळ केली.

या बोलण्यावरून दोघांमध्ये वाद वाढला. त्यानंतर संतापलेल्या पतीने अंगणात पडलेले लाकूड उचलून पत्नीच्या डाव्या हातावर मारहाण केली, अशी तक्रार चंद्रभागा लवंदे यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली आहे.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3199329
Share This Article