GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत १.९५ लाखांची घरफोडी; चिरेखाणीचे साहित्य लंपास

दापोली: दापोली तालुक्यात अज्ञात चोरट्यांनी एका गोदामाचे कुलूप तोडून तब्बल १ लाख ९५ हजार रुपयांचे चिरेखाणीसाठी लागणारे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी दापोलीतील शिदे गावात घडली असून, या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर, साखलोली येथील रहिवासी प्रदीप गणपत जामसदकर (वय ४०) यांच्या मालकीची शिदे गावात सर्व्हे नं. २२/४ येथे चिरेखाण आहे. या चिरेखाणीच्या जागेतील गोदामात त्यांनी कामासाठी लागणारे साहित्य ठेवले होते. १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० ते १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:०० या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गोदामाच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. त्यानंतर आत प्रवेश करून विविध साहित्य चोरून नेले.

या चोरीत ८० हजार रुपये किमतीच्या १५ एचपीच्या ४ मोटारी, २० हजार रुपयांचे कटरचे २ एक्सेल, ४० हजार रुपयांचे ४ डायमंड कटर, ३० हजार रुपयांची २०० मीटरची आर्मर्ड केबल, आणि २५ हजार रुपयांच्या २०० मीटरच्या २ रिमोट तांब्याच्या केबल्स असा एकूण १,९५,००० रुपयांचा माल लंपास करण्यात आला आहे.
ही घटना लक्षात आल्यानंतर प्रदीप जामसदकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) नुसार गुन्हा क्र. १५३/२०२५ दाखल केला आहे. अज्ञात आरोपींचा शोध पोलीस घेत असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

2475383
Share This Article