GRAMIN SEARCH BANNER

विकासाचा रथ शृंगारतळीत; मनसेचे प्रमोद गांधी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

Gramin Varta
163 Views

उदय दणदणे/गुहागर : मराठी भाषा आणि महाराष्ट्र अस्मितेचा बुलंद आवाज राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाशी एक निष्ठा राहणारे मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून शृंगारतळी जि.प. गटातून गांधी निवडणूक लढत आहेत. दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी गांधी यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यापूर्वी गांधी यांनी विधानसभा निवडणुक लढवली होती, भाजपा+शिवसेना (शिंदे गट)+ राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट) महायुती, बलाढ्य शक्ती समोर गांधी यांनी लढत दिली होती, त्यात गांधी अपयशी जरी ठरले असले तरी जनमानसात दातृत्व सेवेची नाळ जोडत समाजात लोकप्रियतेच्या शिखरावर गांधी प्रभावशाली ठरले आहेत. सक्षम नेतृत्व, आधुनिक विचारांच्या शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना “शिवशक्ती युती” चा प्रामाणिक उमेदवार म्हणून गांधी यांच्याकडे पाहिले जात आहे. शृंगारतळी विभागाला अत्याधुनिक सुविधांचा लाभ देऊन गुहागर तालुक्यात आणि महाराष्ट्र पटलावर शृंगारतळी जि.प.गट  विकासात अग्रस्थानी ठेवण्याचे गांधी यांचे स्वप्न आहे.

मुंबईत भाजपा विजया नंतर महाराष्ट्राचं केंद्रबिंदू मुबंईत बिहार भवन बांधण्याचे अल्पसंख्यांकांचे स्वप्न, सद्याचं बदलते राजकारण आणि नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील निवडणुक निकालांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत. या सर्व घडामोडींचा गुहागर मध्ये भाजपा आणि मित्र पक्षांना  शिवसेना (उबाठा )- महाराष्ट्र नवनिर्माण सेना “शिवशक्ती” युती मोठे आव्हान  ठरणार आहे.

Total Visitor Counter

3368871
Share This Article