GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: अपक्ष उमेदवार सीमा रानडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपात केला प्रवेश

Gramin Varta
241 Views

भाजपच्या रूही खेडेकर व रसिका देवळेकर यांना पाठिंबा

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगर परिषदेच्या प्रभाग क्र. ५ मधील अपक्ष उमेदवार सीमा रानडे यांनी भाजप नेते प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेशकर्त्या रानडे यांचा सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही भाजप नेते प्रशांत यादव यांनी दिली आहे.

सीमा रानडे या माजी नगरसेविका असून सहेली ग्रुपच्या संस्थापिका आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात रानडे यांचे भरीव काम आहे. तसेच गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवित यश संपादन केले होते. नगरसेविका पदाच्या कारकिर्दीत विकास कामांना चालना दिली. यातून रानडे यांचा प्रभागात प्रभाव आहे.

यावेळीदेखील सीमा रानडे प्रभाग क्र. ५ मधून अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, भाजप नेते प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजप नेते प्रशांत यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी साहिल रानडे यांचा देखील प्रवेश झाला आहे.

यामुळे प्रभाग क्र. ५ मधील भाजपच्या उमेदवार रूही खेडेकर तसेच प्रभाग १० मधील रसिका देवळेकर यांना सहकार्य होणार आहे. याबद्दल दोन्ही उमेदवारांनी रानडे यांना धन्यवाद दिले आहेत.

यावेळी सौ. स्वप्ना यादव, भाजपच्या उमेदवार सौ. रसिका देवळेकर, सौ. रुही खेडेकर, रत्नदीप देवळेकर, मिलिंद पटवर्धन आदी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3376076
Share This Article