GRAMIN SEARCH BANNER

१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात

Gramin Varta
351 Views

नवी दिल्ली : येथील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मॅनेजमेंट या खासगी व्यवस्थापन संस्थेतील १७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणारा स्वयंघोषित बाबा चैतन्यानंद सरस्वती याला दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरातील एका हॉटेलमधून अटक केली.

रविवारी पहाटे साडेतीन वाजता हॉटेलवर छापा टाकत पोलिसांनी चैतन्यानंदच्या (६२) मुसक्या आवळल्या. त्यानंतर दुपारी दिल्ली येथील एका न्यायालयाने चैतन्यानंदला पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली.गुन्हा दाखल झाल्यानंतर ४ ऑगस्ट रोजी चैतन्यानंद दिल्लीतून फरार झाला. तो आग्रा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पथकाची स्थापना केली.

पोलिसांनी माझी साधूंची वस्त्रे काढून घेतली आहे. मला माझे वस्र घालण्याची परवानगी दिली जात नाही. केवळ मला त्रास देण्याच्या उद्देशाने पोलिस कोठडी ठोठावली.रविवारी पहाटे पथकाने आग्र्यातील पार्थ सारथी नामक हॉटेलवर छापा टाकत चैतन्यानंदला ताब्यात घेतले. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.

Total Visitor Counter

2645593
Share This Article