GRAMIN SEARCH BANNER

रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गावरून तरूणाचा 490 किमी पायी प्रवास; धोकादायक 59 ठिकाणे गडकरींना दाखवली

Gramin Varta
321 Views

रायगड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पायी चालून एका तरूणाने ५९ धोकादायक ठिकाणे शोधून काढली आहेत. या ५९ ठिकाणी वाहनचालकांच्या अपघाताची शक्यता सर्वाधिक आहे. त्यामुळे या ठिकाणांबाबत एक अहवाल तयार करून त्याने तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यातील चैतन्य पाटील या तरूणाने पुढाकार घेतला. फोटो, व्हिडिओंच्या माध्यमांतून त्याने महामार्गावर असलेल्या धोकादायक ठिकाणांची माहिती गोळा केली. तसेच वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे.

रस्ता सत्याग्रह पायी पाहणी मोहीम

रायगड जिल्ह्यातील चैतन्य पाटील यांनी ‘रस्ता सत्याग्रह पायी पाहणी मोहीम’ सुरू केली होती. त्यांनी ९ ऑगस्ट रोजी पळस्पे येथून मोहीमेला सुरूवात केली. मुंबई गोवा महामार्गावर ४९० किमीचा पायी प्रवास केला. रस्त्यावर असलेले खड्डे, खराब रस्ते, रस्त्यांचे अर्धवट राहिलेले काम, सर्व्हिस रस्त्यांचे व पुलांचे अपूर्ण काम याबाबत त्यांनी एक अहवाल तयार केला.

फोटो, व्हिडिओ व जीपीएस टॅग यांचा पाटील यांनी अहवालात वापर केला. तसेच महामार्गावरील धोक्यांबाबत व्हिडिओ बनवून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी वाहनचालकांना केले. मुंबई-गोवा महामार्गावर अपघात टाळण्यासाठी मोहीम हाती घेतल्याचे चैतन्य पाटील यांनी सांगितले.

४९० किमीचा पायी प्रवास

चैतन्य पाटील यांनी ९ ऑगस्ट रोजी पळस्पे येथून पायी प्रवासाला सुरूवात केली. ४९० किमीचा प्रवास करण्यासाठी त्यांना २९ दिवसांहून अधिक कालावधी लागला. या प्रवासावेळी त्यांना महामार्गावर काही त्रुटी आढळून आल्या. तसेच महामार्गावरील ५९ धोकादायक ठिकाणे त्यांनी निश्चित केली आहेत. त्या ठिकाणांवरील समस्या सोडवणे प्रशासनाला सोपे जावे यासाठी पाटील यांनी ‘जीपीएस टॅग’चा वापर केला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना धोकादायक ठिकाणांचे लोकेशन सहज कळणार आहे.

म्हणून पायी पाहणी मोहीम सुरू केली

चैतन्य पाटील हे रायगड जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असलेले त्यांनी लहानपणी पाहिले होते. त्यांनी या महामार्गावर अनेक अपघातदेखील पाहिले आहेत. तसेच या महामार्गाच्या रखडलेल्या कामांमुळे वाहनचालकांना होणारा त्रास त्यांनी अनुभवला आहे. “वाहनचालकांचा अपघात होऊ नये, त्यांना जीव गमवावा लागू नये यासाठी मी पायी प्रवास सुरू केला”, असे चैतन्य पाटील म्हणाले. दरम्यान पाटील यांनी तयार केलेला अहवाल खासदार अरविंद सावंद यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सुपूर्द केला आहे.

Total Visitor Counter

3367466
Share This Article