GRAMIN SEARCH BANNER

दापोली: पाजपंढरीत वादळी वाऱ्यामुळे घराचे मोठे नुकसान

Gramin Varta
3 Views

दापोली: दापोली तालुक्यात या जुलै महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाने 2 हजार मि.मी.चा टप्पा ओलांडला आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 2,369 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर मागील वर्षी याच कालावधीत 2,940.7 मि.मी. पाऊस झाला होता.

या वर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर नियमित पाऊस सुरू झाला असला तरी, वादळी वाऱ्यामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे यावर्षी डिसेंबर महिन्यातही पावसाने हजेरी लावली होती, ज्यामुळे दापोलीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला नाही. मात्र, जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने चांगलाच जोर पकडला.
सध्या दापोलीत वेगवान वाऱ्यांचा प्रवाह अधिक असून, जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे गणपती आणि दसऱ्याच्या सणात नेमका पाऊस जोर धरण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

वादळी वाऱ्यामुळे पाजपंढरीत घरांचे नुकसान
दापोलीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि पावसामुळे पाजपंढरी येथील हिरा कालेकर यांच्या घराचे अंदाजे 3 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. समुद्रकिनाऱ्यांवर सध्या वादळी वारे वेगाने वाहत असून, जोरदार सरींवर पाऊसही कोसळत आहे. यामुळे कच्ची बांधकामे आणि झाडे कोसळून मोठे नुकसान होत आहे. पाजपंढरी येथील नुकसानीचा पंचनामा महसूल अधिकारी अक्षय पाटील यांनी केला आहे.

Total Visitor Counter

2649243
Share This Article