रत्नागिरी: 58 व्या आंतर महाविद्यालयीन मुंबई विद्यापीठ रत्नागिरी साउथ झोन युवा महोत्सवांमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त रत्नागिरीला पन्नास पॉईंट मिळून निर्विवाद चॅम्पियनशिप पटकावली.भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये आयोजित युवा महोत्सवामध्ये १६ महाविद्यालयाने सहभाग घेतला नाट्य ,नृत्य ,संगीत वाड:मय,ललित कला इत्यादी सांस्कृतिक स्पर्धांमध्ये जवळ जवळ 600 विद्यार्थी सहभागी झाले.
नाट्य विभागामध्ये एकांकिका ,स्किट, मूकअभिनय एकपात्री अभिनय ,मिमिक्री अशा स्पर्धा झाल्या .संगीत विभागामध्ये समूह गीत गायन ,शास्त्रीय ,नाट्य आणि सुगम गीत गायन त्याचबरोबर वाद्यवादन . तसेच वेस्टन प्रकारांमध्ये सुद्धा गायन आणि वाद्य वादन स्पर्धा झाल्या. नृत्य विभागात लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य यांच्या स्पर्धा झाल्या . वाड:मय विभागामध्ये वक्तृत्व ,वादविवाद कथाकथन. ललित कला मध्ये रांगोळी, पोस्टर,पेंटिंग,कोलाज ,मातीकाम इत्यादी स्पर्धा झाल्या.
झोनल युवा महोत्सव मध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये खालील प्रमाणे विविध कॉलेजला गुण प्राप्त केले.
गोगटे जोगळेकर कॉलेज: ५०
कीर लॉ कॉलेज : २४
फीनोलेक्स कॉलेज : १७
BMS रत्नागिरी : १६
S.P हेगशेट्य : ११
ASP देवरुख : ०९
नवनिर्माण शिक्षण संस्था संगमेश्वर : ०६
देवरुख Art and Design: ०६
लांजा कॉलेज : ०५
शामराव पेजे : ०४
R.M.C.E.Tआंबव : ०३
चाफे कॉलेज: ०१
D.J.सामंत ,पाली: ०१
मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक श्री.निलेश सावे यांनी रत्नागिरीतील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना असे मत मांडले की युथ फेस्टिवल तुमच्या आयुष्याला कलांटणी देणारा असू शकतो परंतु तुम्ही किती गांभीर्याने घेत आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे .झोनल स्पर्धा ही तुम्हाला फक्त एन्ट्री आहे .फायनलला येताना तुम्ही जोरदार प्रयत्न करणे गरजेचे आहे.त्याचबरोबर रत्नागिरीतील अनेक विद्यार्थी कलाकार आज विविध व्यावसायिक कलाक्षेत्रात अग्रेसर असताना दिसतात त्यांना न्यूज फेस्टिवलचा खूप मोठा फायदा झालेला आहे.डॉ.आनंद आंबेकर गोगटे महाविद्यालय मधून 1995 पासून विद्यार्थी असल्यापासून युथ फेस्टीव्हल मध्ये सहभाग घेतला ते आज 2025 पर्यंत महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावरती समन्वयक म्हणून काम बघत आहे .
अशाप्रकारे युथ फेस्टिवल मध्ये तीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माजी विद्यार्थी नंदकिशोर जुवेकर प्रा.वेदांत सौंदलेकर प्रा.शुभम पांचाळ,प्रा. कश्मिरा सावंत, तेजस साळवी आणि निलेश सावे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष नमिता कीर आणि कार्यवाह दादा वणजु, पदाधिकारी हातखंकर ,प्राचार्य मधुरा पाटील उपप्राचार्य श्रीमती वसुंधरा जाधव ,सांस्कृतिक समन्वयक ऋतुजा भोवड तसेच संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक यांच्या सहकार्याबद्दल जिल्हा समन्वयक डॉ.आनंद आंबेकर यांनी विशेष कौतुक करून आभार मानले.