GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात वाशिष्ठी नदीत पुरुषाचा मृतदेह आढळला

Gramin Varta
188 Views

चिपळूण:  शहरातील गांधारेश्वर परिसरात वाशिष्ठी नदीच्या पात्रात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून तो कोण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासह पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी कामथे येथील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3368332
Share This Article