GRAMIN SEARCH BANNER

वालावलकर रुग्णालयात दोन दिवसाच्या नवजात बाळावर आतड्याची यशस्वी शस्त्रक्रिया

Gramin Varta
280 Views

महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत अवघड शस्त्रक्रिया केली यशस्वी

चिपळूण (प्रतिनिधी) : डेरवण येथील वालावलकर रुग्णालयामध्ये असणाऱ्या बालरोगतज्ज्ञ विभागाने शर्थीचे प्रयत्न करीत एका नवजात बाळाचे प्राण वाचवले. एखादे बाळ जन्माला येताना ते पूर्णपणे निरोगी जन्माला येणे ही महत्त्वाचे असते. सातारा जिल्ह्यातील एका मातेच्या नवजात बाळाच्या बाबतीमध्ये घडले.

काही दिवसांपूर्वीच सातारा जिल्ह्यातील कांबळे कुटूंबातील एक महिला वालावलकर रुग्णालयामध्ये प्रसुतीसाठी दाखल झाली परंतू प्रसूतीपूर्वी केल्या जाणाऱ्या सोनोग्राफीमध्ये बाळाच्या पोटाचे दोन पदर चिकटले दिसले आणि त्यामुळे पोटात हवा भरली आहे. असे निदर्शनात आले. याला (Duodenal Atresia) असे म्हणतात. याशिवाय प्रसूतीनंतर नंतर बाळाचे ऑपरेशन करणे अत्यंत गरजेचं होते. यांची कल्पना नातेवाईकांना बालरोग तज्ज्ञ डॉ. कुरणे आणि डॉ. पार्वती हळबे यांनी कांबळे कुटूंबीयांना दिली होती. या बाळाची शस्त्रक्रिया ही अतिशय क्लिष्ट होती. शिवाय नवजात 2.440kg किलो वजनाच्या बाळाला भूल देणे सुद्धा जिकरीचे ठरणार होते. बाळाच्या आजाराचे निदान लवकरात लवकर करण्यासाठी रॅडिलॉजिस्ट डॉ. नेताजी पाटील यांनी सी. टी.स्कॅन रिपोर्ट्स बालरोग सर्जन डॉ. धनंजय वझे यांच्याशी चर्चा करून शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे असे ठरवले.

पुण्यामधील बालरोगतज्ज्ञ शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. वझे हे तातडीचे ऑपरेशन असल्यामुळे तातडीने पुण्याहून वालावलकर रुग्णालयात दाखल झाले व बाळाची शस्त्रक्रिया करून बाळाला जीवनदान दिले. भूलतज्ज्ञ डॉ. गौरव बाविस्कर आणि सहकारी यांनी या दोन दिवसाच्या नवजात शिशुला भूल देऊन शत्रक्रिया सुखरूप पार पाडण्यात यश मिळवले. ऑपरेशन नंतर या बाळाची काळजी घेणे अत्यंत जिकिरीचे होते पण ती धुरा बालरोगतज्ज्ञ डॉ. अंकिता सुर्वे व डॉ. नताशा, पंक्ती, तनिषा, प्रतिक, स्वप्नील यांनी उचलली. शस्त्रक्रिया उत्कृष्ट झालीच परंतू शस्त्रक्रियेनंतर बाळाची योग्य ती काळजी NICU विभागातील सिस्टर वृषाली, सोनाली, श्रुतिका, जान्हवी, संपदा, निलम, शितल, ऐश्वर्या, प्राची, आकांक्षा, ईशा, साक्षी यांनी घेतली तसेच बाळाचे ऑपरेशन व इतर पूर्ण खर्च महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत केला गेला.

Total Visitor Counter

3369387
Share This Article