GRAMIN SEARCH BANNER

सावर्डेच्या पृथ्वी पाटील यांचा ५ दिवसांत १५०० किमी सायकल प्रवास पूर्ण; कोकणाच्या सायकलिंग इतिहासात नोंद!

Gramin Varta
219 Views

संदिप घाग / सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील डॉ. कृष्णकांत पाटील यांचे सुपुत्र पृथ्वी पाटील यांनी केवळ ५ दिवसांत तब्बल १५०० किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण करून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. (कराड-सातारा-पंढरपूर-सोलापूर-बारामती ते पुन्हा त्याच मार्गे कराड) असा हा BRM सायकलिंग प्रवास होता.

पृथ्वीने अनुक्रमे ६००, २००, ४०० आणि ३०० किलोमीटरचे सलग टप्पे पार केले असून, ही कामगिरी कोकणातील सायकलिंग क्षेत्रात पहिल्यांदाच नोंदली गेली आहे. केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक शक्ती, प्रचंड सहनशीलता आणि अटळ जिद्दीचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.

पृथ्वी पाटील यांच्या या यशाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सायकलप्रेमींमध्ये प्रेरणेचा नवा संचार झाला आहे.त्यांच्या कामगिरीचे आमदार शेखर निकम यांनी विशेष कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जिद्द असेल तर अंतर कधीच अडथळा ठरत नाही,हे पृथ्वीने आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.

Total Visitor Counter

3199601
Share This Article