GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘प्रथमोपचाराची मूलतत्त्वे’ अभ्यासक्रम

रत्नागिरी: येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला PM-USHA अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानातून ‘प्रथमोपचाराची मूलतत्त्वे’ अभ्यासक्रम पार पडला.महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध प्रमाणपत्र, कौशल्य विकसन आणि व्यावसायिक कौशल्यावर आधारित अभ्यासवर्गांचे आयोजन केले जाते.

त्यानुसार हा अभ्यासक्रम पार पडला. प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने प्रथमोपचाराची मूलतत्त्वे (First Aid Fundamentals) या प्रमाणपत्र अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यासवर्गाच्या सांगता समारंभात उपअग्निशमन अधिकारी विवेक राणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी प्रथमोपचार व आपत्ती व्यवस्थापनातील विविध संधींविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर होते. त्यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली आणि प्रथमोपचाराचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाला डॉ. यास्मिन अवटे व प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ मधुरा मुकादम उपस्थित होत्या.

या अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराची मूलतत्त्वे या शीर्षकाखाली जखमांवर विविध प्रकारची पट्टी लावणे, अग्निशामक उपकरणाचे उपयोग, जखमींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, विमोचनासाठी विविध दोरगाठी तयार करणे अशी विविध उपचार पद्धती व कौशल्ये शिकविण्यात आली. अनन्सिंग गढरी, अक्षय जाधव, योगेश पावसकर या आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभवी तज्ञ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.

हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. चार विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. अभ्यासवर्गाचे समन्वयक प्रा. अंबादास रोडगे यांनी उत्कृष्ट नियोजन केले. पीएम-उषा समन्वयक आणि शास्त्र शाखा उपप्राचार्या प्रा. डॉ. अपर्णा कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.

Total Visitor Counter

2474889
Share This Article