संगमेश्वर : तालुक्यातील मेघी बौध्दवाडी येथील तरूणी मंगळवार 9 सप्टेंबर पासून बेपत्ता झाल्याची नोंद देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ऋतुजा शामसुंदर जाधव (18, मेघी, संगमेश्वर) असे बेपत्ता तरूणीचे नाव आहे. वडील शामसुंदर जाधव यांनी फीर्याद दिली आहे. ऋतुजा ही 9 रोजी सकाळी १०.३० वा. देवरूखला जाते असे सांगून बाहेर पडली. सायंकाळी उशीरापर्यंत ती घरी न परतल्याने सर्वत्र शोधाशोध चौकशी करण्यात आली. तरीही तीचा थांगपत्ता न लागल्याने ऋतुजा बेपत्ता असल्याची खबर देण्यात आली आहे.
तिचा वर्ण साबळा, चेहरा गोल केस स्ट्रेटनिंग केलेले, उंची ५ फूट २ इंच, अंगाने मध्यम, अंगावर जिन्स पँन्ट, टिशर्ट व जैकेट, कानात साधे रिंग, पायात सैंडल, उजव्या हातावर ऋतुजा गोंदलेले असे तीचे वर्णन आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास देवरूख पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देवरुख मेघी येथून १८ वर्षीय तरूणी बेपत्ता
