GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : रत्नागिरी साळवी स्टॉप येथे सलूनला आग

Gramin Varta
447 Views

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप परिसरातील एका सलूनला आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने धावपळ उडाली. आगीची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. केवळ अर्ध्या तासात जवानांनी आग आटोक्यात आणत मोठी हानी टाळली.

या आगीत दुकानातील खुर्च्या जळून खाक झाल्या असून इतर साहित्याचेही नुकसान झाले आहे. घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार ही आग शॉर्ट सर्किट ने लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे

Total Visitor Counter

2648788
Share This Article