GRAMIN SEARCH BANNER

डी.बी.जे. महाविद्यालयाची योगपटू कु. तन्वी रेडीज हिची ‘वर्ल्ड चॅम्पियनशीप’ साठी निवड

Gramin Varta
17 Views

चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. (स्वायत्त) महाविद्यालयाच्या बी.एस्सी. अंतिम वर्षात शिकणारी विद्यार्थिनी योगपटू कु. तन्वी रेडीज हिची नुकतीच हरियाना येथे झालेल्या निवड चाचणीत पुढे गुजरात येथे जून २०२६ मध्ये होणाऱ्या ‘वर्ल्ड चॅम्पियनशीप’ साठी निवड झाली आहे. या अभिमानास्पद निवडी आधी तन्वीने अनेक पुरस्कार ‘योग’ या क्रीडा प्रकारात मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

यामध्ये सन २०२५ मध्ये झालेल्या एशिअन गेम्समध्ये दोन सुवर्ण पदके प्राप्त केली आहेत. याशिवाय तिने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय स्तरावर भरीव कामगिरी करून एकूण १० सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदके मिळवली आहेत. या सर्व यशात तिचे प्रशिक्षक श्री. रणवीर सावंत यांचा मोलाचा वाटा आहे. तन्वीच्या या यशाबद्दल तिचे नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. मंगेश तांबे, सर्व सभासद तसेच  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट, उप-प्राचार्य डॉ. ऋचा खवणेकर, डॉ. चेतन आठवले, रजिस्ट्रार श्री. विजयेंद्र जाधव आणि सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Total Visitor Counter

3358458
Share This Article