GRAMIN SEARCH BANNER

महाराष्ट्राचा आझाद जैनवाल ठरला 72 व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा ‘भारत श्री’

Gramin Varta
36 Views

स्पर्धा उत्साहात संपन्न; विजेत्या दहाजणांचा गौरव

रत्नागिरी : रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या 72 व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात मानाचा भारत श्री किताब महाराष्ट्राच्या आझाद जैनवाल याने पटकावला. तर मध्य प्रदेशचा आसिफ मुसा याला भारत उदय हा किताब देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील दहा विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित 72 व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे रत्नागिरीतील खातू नाट्य मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. 1 आणि 2 मे अशा दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून दर्जेदार स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेच्या परीक्षांसाठी अभ्यासू राष्ट्रीय पंच देखील रत्नागिरीत दाखल झाले होते. दोन दिवसाच्या या स्पर्धेला रत्नागिरीतील प्रेक्षकांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवला.

स्पर्धेचा निकाल 2 मे रोजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. निकालात महाराष्ट्राच्या आझाद जैनवाल याने बाजी मारत प्रथम क्रमांकाचा आणि मानाचा भारत श्री हा किताब पटकावला. मध्य प्रदेशचा आसिफ मुसा याला भारत उदय हा किताब देण्यात आला. मध्य प्रदेशचा चंद्रभान धुर्ये याला भारत किशोर पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्राचा गौरव तेली याला भारत कुमार किताब देण्यात आला. मध्य प्रदेशचा करण कुमार याला भारत भारत केसरी किताब देण्यात आला.

महाराष्ट्राच्या आदित्य चळपीवार याला भारत मेन्स फिजिक्स ज्युनियर किताब देण्यात आला तर रत्नागिरीचा सुरज पाटणे याला भारत मेन्स फिजिक्स सिनियर किताब देण्यात आला. याशिवाय महाराष्ट्राचा नवाझ शेख याला भारत क्लासिक फिजिक्स ज्युनियर आणि आझाद जैनवाल याला भारत क्लासिक फिजिक्स सिनियर किताब पटकावला. महाराष्ट्राच्या निखिल त्रिवेदी भारत जीन मॉडेल कितबाचा मानकरी ठरला.

बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी आयएफबीएफचे जनरल सेक्रेटरी बी. कृष्णराव, स्पर्धाप्रमुख वीरेंद्र वणजु, सदानंद जोशी, नगरसेवक बाळू साळवी, नित्यानंद भुते, जितेंद्र नाचणकर, शैलेश जाधव, फैयाज खतीब, संतोष कदम, किशोर पाटील, अंकुश कांबळे, नरेंद्र वणजू ,इम्तियाज काझी, दीनानाथ कोळवणकर, संतोष थोरात, शैलेश नार्वेकर, बंड्या वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Total Visitor Counter

3358070
Share This Article